*पत्रकार सुरक्षा समितीची बैठक, आंदोलने त्रीव्र करण्याचा वज्र निर्धार*

*पत्रकार सुरक्षा समितीची बैठक, आंदोलने त्रीव्र करण्याचा वज्र निर्धार*



सोलापूर /पत्रकार सुरक्षा समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस होते बैठकीच्या प्रारंभी पाथरी येथील जेष्ठ पत्रकार माणिक केंदे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली .



या बैठकीत *पत्रकार संरक्षण कायदा*, 
*राज्यातील सर्वच पत्रकारांची जिल्हानिहाय नोंदणी*
*पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी*
*घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका बाबत जाचक अटी रद्द करणे*
*जेष्ठ पत्रकारांना किमान पंधरा हजार रुपये पेन्शन*
या सह पत्रकारांच्या अनेक विषयावर सखोल चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने आधीक त्रीव्र करण्याचा वज्र निर्धार करण्यात आला 



*प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा सरकार वर हल्लाबोल* 
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटून गेली तरी पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी होत नाही, दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होत आहेत मारहाण होत आहे अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून नोंदणी नसल्याने त्यांना केंद्र व राज्यसरकार च्या वैद्यकिय  योजनेचा लाभ मिळत नसल्याने पत्रकारांना उपचार अभावी आपला जीव गमवावा लागत आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्र ला काळिमा फासणारी असून या  राज्यात पत्रकार सुरक्षित नाहीत, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दयावा तसेच दिवंगत  पत्रकार माणिक केंदे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी अशी जोरदार मागणी करून या सरकारने लवकर पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा या सरकार विरोधात आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .


 



यावेळी पत्रकार सुरक्षा  समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना, राज्य सल्लागार अडव्होकेट संतोष कुलकर्णी   पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे, मराठवाडा विभाग अध्यक्ष कलीम शेख, जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे उपाध्यक्ष श्रीमंत चौगुले, विश्व नाथ चव्हाण शिवाजी केंगार  संपर्कप्रमुख राजेंद्र पवार, पंढरपूर तालुका अध्यक्ष रामभाऊ सरवदे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भगवान कदम शहर संघटक डॉ राजेंद्र शहा कार्याध्यक्ष अभिजित पत्की, सचिव अरुण सिडगिड्डी उपाध्यक्ष प्रभाकर एडके संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार बाबा काशीद, अण्णा धोत्रे, अक्की बबलाद, अल्ताफ शेख, प्रसाद ठका रुपेश भोसले, आकाश सोमा, ऋषीं मादास, विष्णू सुरवसे, आयुब शेख, योगेश स्वामी, झाकीर हुंडेकरी दिनेश सलगरे, लक्ष्मण गणपा, विलास काळे, विजय कांबळे, दत्ताजी पाटील, चैतन्य उत्पात, हरी भिसे, संतोष गायकवाड वसंत हांडे, अनिल घाटगे सतीश गडकरी सह अनेक पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते