*कोरोना न काय शिकवलं?

*कोरोना न काय शिकवलं?*



        सर्व जगात हाहाकार माजलेला असताना,लाखो लोकांचे बळी घेऊन मानवी जीवन उध्वस्त करणाऱ्या अतिशय वेगवान गतीने निसर्गाचा ऱ्हास करून पुढे जाणाऱ्या माणसाला अचानक ब्रेक लावण्याचं काम या उघड्या डोळ्यांनी पण न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या व्हायरस ने केलं.माणसाने माणसासारखच जगल पाहिजे अन्यथा त्याचा विनाश अटळ आहे असा संदेश हा आजार मानवजातीला देऊन गेला.परंतु प्रत्येक संकट आपणास काहीतरी शिकवून जात असते अशा अनेक गोष्टी तो शिकवून गेला,त्यापैकीच एक मला आवडलेली म्हणजे भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मोजक्या लोकांच्या आणि कमी खर्चात होणारे लग्न सोहळे.



        आजकालचे लग्न म्हणजे जणू एक प्रकारचे शक्ती प्रदर्शनच थोडक्यात जो सर्वात जास्त आपल्या मुलगा/मुलीच्या लग्नात पैसा खर्च करेल जेवढी जास्त उधळपट्टी करेल तो समाजात अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणला जातो मग त्याची आर्थिक कुवत असो की नसो भलेही त्याने कर्ज काढावे आयुष्भर फेडावे पण लग्न मात्र थाटातच करावे अन्यथा त्याला बाहेर लोकांमध्ये मानसन्मान मिळणार नाही अशी पद्धतच आपल्या समाजाने घालून दिली आहे.



        ग्रामीण भागातील दिवसागणिक वाढत जाणाऱ्या शेतकरी अात्महत्येची कारण जर आपण बघितली तर पीककर्ज काढून शेती ऐवजी त्या पैशाची लग्न समारंभावर केलेली उधळपट्टी हेच मुख्यतः निदर्शनास येते.



 अगदी अल्पभूधारक शेतकरी पीक कर्जाच्या नावाखाली बँकेकडून कर्ज घेऊन थाटामाटात घरातील लग्न पार पाडतो पण तिथून एक दोन वर्ष जर पाऊस कमी पडला तर त्याच्यावर नापिकीची वेळ येते इकडे कर्जाचा बोजा वाढत जातो आणि शेवटी आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय त्याच्याजवळ राहत नाही.लग्नाच्या वेळी 8-8 दिवस त्याच्या घरी गोड धोड खाणारे त्याचे सगे-सोयरे यापैकी एकही जण त्याच्या या संकटाच्या काळात मदतीला धाऊन येत नाहीत आणि अखेर शेतकरी आत्त्महत्येच्या नावाखाली त्याचा मृत्यू खपवला जातो.


                      नोकरी विषयक जाहिरात




   कोरोनाच्या काळात होणारे लग्न कार्य असेच पुढील काळातही सुरू रहले तर नक्कीच कोणत्याही शेतकऱ्याला
 आपला जीव गमण्याची वेळ येणार नाही आणि त्याची आर्थिक बाजू कायम मजबूत राहील . 



 याप्रसंगी जगतगुरु तुकोबा म्हणतात, 
*हौस दावूनी लग्नप्रसंगी कर्ज काढिता किती! जन्मभर दुःख पुढे भोगीती!!  कर्ज फिटेना,दुःख मिटेना,सणावारादी अती ! कशाला भ्रमी पडीता मती* ?



सरते शेवटी लग्न म्हणजे हे दोन व्यक्तींच मिलन असत त्यांच्या जीवनाचा तो महत्वाचा क्षण असतो मुलगा, मुलगी आणि दोन्ही बाजूकडील मोजके लोक जरी उपस्थित असले तरी त्याला लग्नच म्हंटले जाते बरका!!!!!!!!!! बाकी संसाराचा गाडा त्या दोघांनाच हाकायचा असतो.



*शुभम प्रमोदराव ठाकरे*
      *अमरावती*
   *9765488329*