जितेंद्र जानावळे उपविभागप्रुख यांनी प्रवीण परदेशी साहेब मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना केली तक्रार


*मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट*..


जितेंद्र जानावळे उपविभागप्रुख यांनी प्रवीण परदेशी साहेब मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना केली तक्रार


 


शिवसेना जितेंद्र जानावळे उपविभागप्रुख यांनी पुन्हा


 


एकदा आपला आवाज उठवला आहे . मुंबई मध्ये कोरोना चे थैमान सुरू आहे आणि याच वेळी मुंबई मधील नानावटी रुग्णालयात कोरोना रुग्णाची लूट सुरू असल्याची तक्रार जितेंद्र जानावळे यांनी केली आहे.


मुंबईतील नानावटी रुग्णालय येथे कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल करताना डिपॉझिट दोन लाख रुपये आणि दिवसाला पस्तीस हजार रुपये तसेच जनरल वॉर्ड करीता डिपॉझिट रुपये एक लाख आणि दिवसाला पंचवीस हजार रुपये बिल आकारले जात असल्याचा आरोप केला आहे.


 


सदर रुग्णालय धर्मादाय आयुक्त यांच्या अधिपत्याखाली येत असून सर्व नियम धाब्यावर बसवून भरमसाट बिल कोरोना रुग्णांकडून या नानावटी रुग्णालयात आकारले जातात.
सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत काही खासगी रुग्णालयांना आपण परवानगी दिली आहे,


परंतु या सर्व खासगी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट चालू आहे .



सदर बाबतीत दखल घेऊन पालिका आरोग्य नियमानुसार उपचार दर निश्चित करून खासगी रुग्णालय व्यवस्थापनेला सूचना देऊन कोरोना रुग्णांचे उपचार करण्यास आदेश द्यावे तसेच पूर्वी आकारलेले कोरोना रुग्णांचे उपचाराचे जादा बिल त्या रुग्णांस परत करावे अन्यथा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावे ही विनंती  जितेंद्र जानावळे केली


 


 


सदर प्रत आदित्य ठाकरे साहेब पालक मंत्री, मुंबई उपनगर व अमय घोले अध्यक्ष  आरोग्य समिती मुंबई महानगर पालिका यांना देखील पाठवण्यात आली आहे.